Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र ग्रामीण न्युजच्या बातमीचा इफेक्ट! संथगतीने चाललेले विद्युत केबल चे काम तीनच दिवसात सुरु.


(शेख बाबा लोणार प्रतिनिधी)

मौजे अंजनी खुर्द येथील "विजेचे व्होलटेज अतिशय कमी व वारंवार विजेचा लपंडाव" या मथळ्याखाली दिलेल्या दि.21/05/2024 च्या बातमीची दखल घेत कित्येक दिवसापासून रखडलेल्या विद्युत केबलचे काम अवघ्या तीनच दिवसात युद्धपातळीवर संपूर्ण गावात महावितरण कर्मचारी आणि ठेकेदार यांच्याकडून सुरु झाले या बातमीचे गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. अवैध वीज वापर आणि वीज चोरीला आळा बसेल हे मात्र तितकच खरं आहे.