Ticker

6/recent/ticker-posts

समॄध्दी इंटरचेंजजवळ वनोजा फाट्याजवळ भीषण अपघात



संजय भरदुक मंपीर प्रतिनिधी 

मंगरूळपीर ते अकोला रोडवर शेलुबाजार वनोजा फाट्याजवळ समॄध्दी इंटरचेंजजवळ एसटी व बूलेट चा भीषण अपघात होवून या घटनेनंतर जागीच एक जण ठार झाल्याची माहिती २२ मे ला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली

प्राप्त माहिती नुसार वाशिम आगाराची वाशिम ते शेलुबाजार मार्ग अकोला जात असलेली एसटी बस क्रमांक ४० एन ८९५८ असून याच मार्गाने जात असलेली बुलेट या दोन वाहनात अपघात झाला यामध्ये दुचाकीस्वार अनुप संजय मानवतकर रा.भेंडी (महाल)ता. बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील रहिवासी घटनास्थळी मॄत्यू झाला . मॄत व्यक्ती हा बार्शी टाकळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री गजानन मानवतकर पाटील यांचा पुतण्या व बार्शी टाकळी पंचायत समिती सभापती सौ सुनंदा बाई मानवतकर यांचा मुलगा असल्याचे माहिती आहे.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी समॄध्दी महामार्गावरील आपत्कालीन पथक व रूग्णवाहीका तत्काळ दाखल झाले परंतु अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार चा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी पोलीसांनी दाखल घेतली असून पुढील कार्यवाही करीत आहेत.