प्रतिनिधी दीपक गुरव चाळीसगाव
चाळीसगाव- चाळीसगाव ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचा समारोप मोठ्या भक्ती भावाने दत्तवाडी येथे संपन्न झाला. यावेळी भव्य परिसरात पालखी मिरवणूक निघाली. मिरवणुकीत सर्व साई भक्त व महिला भगिनी सहभागी झाले होते. साईबाबांच्या नामस्मरणाने व भजनाने परिसर दुमदुमून गेला पालखी मिरवणूक नंतर महाप्रसाद (भंडारा) चे आयोजन करण्यात आले होते.
सदर (भंडारा) महाप्रसाद कार्यक्रमास आपल्या चाळीसगाव तालुक्यातील साई भक्त मंडळी तसेच साई श्रद्धा भक्त मंडळाचे सर्व सदस्य यांनी अनमोल सहकार्य केले. तसेच दत्तवाडी भागातील सर्व साईभक्त व भाविक मंडळींनी अन्नदान स्वरुपी योगदान व प्रतिसाद दिला. त्याबद्दल श्री. साईश्रद्धा भक्त मंडळ दत्तवाडी ग्रुप वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.





Social Plugin