Ticker

6/recent/ticker-posts

घरगुती खानावळ चालविणाऱ्या गायत्री पाटील यांच्या रोहीतला दहावीच्या परीक्षेत ९७.२० टक्के गुण; शाळेत प्रथम



प्रतिनिधी दीपक गुरव  चाळीसगाव

चाळीसगांव :- पती निधनाचे दुःख पचवून आपले घर सावरण्यासाठी गायत्री अनिल पाटील यांनी उपजिवीकेचे साधन म्हणून घरगुती खानावळ सुरू केली आणि या खानावळीच्या माध्यमातून आपल्यासह आपल्या कुटूंबाला सावरले. गायत्री यांना एक मुलगा आहे, त्याचे नांव रोहीत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ मध्ये रोहीतला ९७.२० टक्के गुण मिळाले आहेत. तो चाळीसगांव एज्युकेशन सोसायटी संचलित आ.ब. मुलांच्या हायस्कूलमधुन सर्वप्रथम आला आहे.

वर्षभर चिकाटीने अभ्यास केला शिवाय शाळेतही १०० टक्के उपस्थिती दिली आणि आईला देखील तिच्या घरगुती खानावळीच्या कामात रोहीतने मदत केली. रोहीत हा मोबाईल आणि टी. व्ही. पासून सतत दुर राहीला, त्याने अवांतर वाचन केले आणि त्याचाच फायदा त्याला दहावीच्या परीक्षेत झाला. रोहीत हा मुळचा वाघडू येथील रहिवाशी, वडील ठेकेदार होते, ते पाचवीत असतांनाच वारले त्यानंतर आई रोहीतसह चाळीसगांवी आली आणि टाकळी प्र.चा. येथे सम्राट नगरमध्ये स्थायिक झाली. दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल आ.बं. मुलांच्या हायस्कूलचे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन आणि मॅनेजिंग बोर्डाचे व्हा. चेअरमन योगेश अग्रवाल यांनी रोहीतचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी रोहीतची आई श्रीमती गायत्री पाटील उपस्थित होत्या.