Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - राज्यात जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद आणि शिक्षक पदवीधर संघाच्या निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे. विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदविधर यासोबतच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या चारही जागांवर येत्या १० जून रोजी मतदान तर १३ जून रोजी मतमोजणी करण्यात येणार होती. शाळांमधल्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणुक घेण्यात यावी अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करण्यात आली होती.

निवडणुक आयोगाने यावर विचार करुन महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या मतदार संघातून ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे हे निवडून गेले होते. त्यांची मुदत ७ जुलै पर्यंत आहे. या मतदार संघात ७० हजार शिक्षक मतदार आहे.