Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पिंपळगाव बसवंत येथे



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पिंपळगाव बसवंत येथे उद्या होत आहे. पावसामुळे खबरदारी म्हणून वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या या सभेसाठी पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात एकर मैदान सज्ज करण्यात येत आहे. पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात भव्य सभामंडपाची उभारणी करण्यात येत आहे. 

मुख्य मंडप व त्याला लागून दोन उपमंडप अशा पद्धतीने सभामंडपाची उभारणी सुरू आहे. या मंडपात चाळीस बाय शंभर फूट लांबीचे आणि आठ फूट उंचीचे भव्य व्यासपीठ साकार होत आहे. मंडपाच्या उभारणीसाठी संपूर्ण स्टीलचा वापर करण्यात येत असून, सदरचे स्टील मुंबई येथून आणण्यात आले आहे. या मंडपाच्या उभारणीसाठी राजस्थान, बिहार, मुंबई येथील शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. भव्य मंडपासाठी लोखंडी बार उचलण्यासाठी चार पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन ग्रामीण व शहर पोलिसांचा संयुक्त बंदोबस्त नेमण्यात आला आहे. 

पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखा, गोपनीय शाखा, दहशतवादीविरोधी कक्ष, राज्य गुप्तवार्ता, राज्य गुन्हे अन्वेषण यांसह सर्व विभागांचा बंदोबस्त तैनात असेल. अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तामुळे वाहतूक मार्गात बदल केले जातील. सुरक्षेच्या कारणास्तव काही अटी-शर्ती व निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.