Ticker

6/recent/ticker-posts

33 केव्ही बेलाड उप केंद्र येथे शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा ठिय्या

                                 संभाजी शिर्के यांनी उपकेंद्राला ठोकले  टाळे

प्रतिनीधी रविंद्र गव्हाळे मलकापुर

‌‌   बेलाड :- 26 मे रोजी झालेल्या वादळी  पावसामुळे 33 के व्ही  बेलाड उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील गावातील व शेतीतील वीज खंडित झाली होती .

यामध्ये प्रामुख्याने उपकेंद्र पासून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे विद्युत खंबे जमीन दोस्त झाले होते . वीस ते पंचवीस दिवस उलटून सुद्धा शेतीपर्यंत वीज पोचलेले नाही त्यामुळे शेतकरी खूप मोठा अडचणीत आलेला आहे. उपकेंद्र अभियंता यांच्या निष्काळचेपणामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या नुकसानीचा फटका बसत आहे याच त्रासाला कंटाळून आज शेतकऱ्यांनी संभाजी शिर्के यांना सोबत घेऊन महावितरण मध्ये ठिय्या केला व महावितरण ला टाळे ठोकले‌

आपल्या विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी बेलाड उपकेंद्र येथे के् आपल्या व्यथा मांडल्या पेरणीच्या  तोंडावर महावितरण चे धीम्या गतीने चालू असलेल्या कामावर शेतकऱ्यांनी ताशेरे ओढत महावितरणच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले व आपल्या शेता पर्यंत कधी सुरळीत वीज पोहोचेल याची ग्वाही त्यांच्याकडून बोलून घेतली संबंधित अधिकारी यांनी येत्या सहा ते सात दिवसात सर्व शेतातील बीज सुरळीत होईल अशी ग्वाही दिली यामध्ये विशेष संभाजी शिर्के यांची उपस्थिती होती तसेच बेलाड, घिर्णी, माखणेर,  वरखेड ,बाहापुरा पान्हेरा, वाघूड या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.