तिनिधी आकाश जळके
अंबड मध्ये लक्ष्मण हाके यांच्या समर्थनात आज अंबड बंदची हाक समस्त ओबीसी बांधवाची अंबड बंदची हाक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनात आज जालना जिल्ह्यातील अंबड यांची हाक देण्यात आली आहे लक्ष्मण हाके व वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.
जोपर्यंत सरकार लेखी स्वरूपात आश्वासन देत नाहीत तोपर्यंत पोषण सुरू ठेवण्याचा निर्दास लक्ष्मण हाके व वाघमारे यांनी केला आहे. आजचा सातवा दिवस असून लक्ष्मण हाके व वाघमारे यांची तब्येत खालावत चाललेली आहे .मात्र सरकार निर्णय घेत नाहीत त्यामुळे लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनात ओबीसी बांधवाकडून अंबड बंदची हाक देण्यात आली आहे .व्यापारी व नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मागील सात दिवसांपासून वडीगोद्री येथे आमरण उपोषणास बसलेले ओबीसी योध्ये प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची प्रकृती अत्यंत खालवलेली असल्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाले आहे.आतापर्यंत शासनाने उपोषणकर्त्यांच्या कोणत्याही मागण्याची दखल घेतली नाही.हे सरकार फक्त एक विशिष्ट जातीचे सरकार आहे.आणि ओबीसी मध्ये 376 जातींवर अन्याय करण्याचे पाप करत आहे .संविधानिक पदावर बसलेले सर्व आमदार ,खासदार ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे एकाच आंदोलनाला भेट देतात .व एकाच व्यक्तीची व जातीची दखल घेतात.त्यामुळे महाराष्ट्रात जातीयतेड निर्माण करण्यास हेच लोक जबाबदार आहेत .अशी भावना महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाजामध्ये निर्माण झाली आहे.तरी शासनाने ओबीसी समाजाचे तीव्र असलेल्या भावनेची दखल घ्यावी .नसता शासनाला ओबीसी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल .आणि लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या जीवितास हनी पोहोचल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनची राहील.
'ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या'
1 :- लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनाची दखल घेणे.
2 :- शासनाने काढलेली सगेसोयरे ची अधिसूचना तात्काळ रद्द केल्याचे घोषित करणे.
3 :- खोटे कुणबी प्रमाणपत्र दाखले रद्द करणे व खोटे कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे.
4 :- बीड येथे हिंसाचारास जबाबदार असणाऱ्या आंदोलकांना मोकळीक न देता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
5 :- वडीगोद्री येथे ओबीसी बांधवांवर जे खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घ्यावे.
6 :- समाज माध्यमातून ओबीसी नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.






Social Plugin