प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
चाळीसगाव: शहराचे वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासनाने चाळीसगावसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली त्यामुळे गिरणा नदीवरून चाळीसगावसाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आज ही पाईपलाईन सुरू आहे. एकेकाळी शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी पाईपलाईन संबंधित कंत्राटदाराने काढून ठेवली आहे
ह्या पाईपलाईनचे पाईप अनेकवेळा चोरी करण्याचे प्रयत्न झाले काही दिवसांपूर्वीच मेहुनबारे येथील ३ ४ इसम पाईपलाईनचे पाईप घेऊन जात असताना चाळीसगाव पोलिसांनी रंगेहात धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता पुन्हा पुन्हा त्या पाईपांची चोरी होते चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पलिका प्रशासनाकडून वेळ काढू पणा बधावयास मिळतो याचे कारण काय?
मंगळवार ता.११ रोजी दुपारच्या सुमारास करगाव लांबे बहगाव दरम्यान चोरी केलेले पाईपची वाहतूक करत असताना एक ट्रॅक्टर व त्यावर दोन जण मिळून आले ट्रॅक्टर कारवाईसाठी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले मात्र तक्रारदार कुणी आलं नसल्याने आत्तापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.





Social Plugin