Ticker

6/recent/ticker-posts

देशी पिस्तूल सह रस्त्यावर खुलेआम फिरणाऱ्याला अटक



बाळासाहेब पवार प्रतिनिधी 

पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिलोना येथे देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतुस यासह पुसद येथील एका तरुणाला अटक करण्यात आली. सदर कारवाई दिनांक 11 रोजी करण्यात आली. शेख सोहिल शेख खाजा रा. मधुकर नगर पुसद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोफाळी पोलिसांना शीलोना येथे एक व्यक्ती देशी पिस्तूल व जिवंत काडतुस सह रस्त्यावर खुलेआम फिरत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोफाळी पोलिसांनी उमरखेड पुसद रोडवर शिलोना गावासमोर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

 आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतुस मिळाले. पोलिसांनी पंचा समक्ष कारवाई करून एकूण 17000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा आधारसिंग सोनोणे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मस्के, पोलीस नाईक हर्षद पंडितकर, पोलीस कॉन्स्टेबल हिम्मत बंडगर यांनी पार पाडली.