पुसेगाव दि .[प्रतिनिधी ]
मुंबईकर, पुणेकर, इतर नोकरवर्ग व व्यावसायिक यांच्या अमूल्य देणगीतून जयहिंद हेल्प सेंटर, राजापूर या संस्थेच्या माध्यमातून राजापूरातील गरीब व शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आले याप्रसंगी काही देणगीदार उपस्थित होते व मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी ह.भ.प. प्रवचनकार सौ. अनिता नामदेव घनवट मॅडम, मुंबई यांनी छान मार्गदर्शन केले. अभ्यासिका गावात स्थापन करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
देणगीदार यांच्या हस्ते सर्व नोंदणी व अवेळी काही विद्यार्थी आले त्यांनाही मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाला दत्तात्रय काळुखे, हणमंत घनवट गुरूजी, दशरथ घनवट गुरूजी, डॉ अशोक गार्डे, दिपक घनवट, बळीराम सुर्यवंशी, बापूराव घनवट, अजित दिडके, किसन म्हेत्रे, अविनाश घनवट, सौ. कविता दिपक घनवट, सौ. प्राजक्ता आशिष डंगारे, अमोल घनवट, श्रीमती हौसाबाई गार्डे, श्रीमती साखरीबाई माळी, सारीका लोखंडे, उमेद महिला बचत गट आदि बहुसंख्येने पुरुष, महिला व विद्यार्थी हजर होते. दिपक घनवट यांनी समस्त देणगीदार व ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांचे आभार मानले





Social Plugin