बाळासाहेब पवार प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर कोणत्याही क्षणी महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीची आगामी निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती ठरवण्यासाठी संघटनेचे मुख्य सल्लागार ज्येष्ठ नेते माजी नगर उपाध्यक्ष, माजी बांधकाम सभापती तथा निवृत्त व्यवस्थापक आपला जीन प्रेस श्री उमाकांत मडके व संघटनेचे मुख्य मार्गदर्शक माजी उमरखेड तालुका अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री रजाकशाहीद सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघटनेचे अध्यक्ष संपादक विलास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक विश्रामगृहावर दिनांक 23 जून 2024 रोजी दुपारी एक वाजता मिटिंग संपन्न झाली प्रथम ह्या मीटिंगमध्ये संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख संपादक इरफान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्या मार्फत हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्यात त्यानंतर संघटनेचे कामकाज सुरू झाले.
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने प्रथम संघटना मजबूत करण्यासाठी संघटनेची बांधणी करावी लागेल त्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये संघटनेच्या सदस्यांची जमेल त्या पद्धतीने नोंद करावी असे ठरले त्यानंतर प्रभागातील मान्यवर व सर्वसामान्य लोकांच्या भेटीगाठी घेऊन आगामी नगर परिषद च्या उमेदवारांची चाचपणी करावी लागेल सक्षम असलेल्या उमेदवारास कोअर कमिटी मध्ये कोअर कमिटीच्या पदाधिकारी व सदस्याच्या मताने चर्चा करून उमेदवार निश्चित करण्यात यावे तसेच उमेदवार किंवा निवडून आलेला नगरसेवक संघटनेशी एकनिष्ठ राहावा म्हणून सर्व कायदेशीर प्रक्रिया करण्यात याव्यात असे मुख्य सल्लागार माजी नगर उपाध्यक्ष उमाकांत मडके यांनी सुचवले.
संघटनेचा सदस्य पदाधिकारी व उमेदवार हा संघटनेची एकनिष्ठ राहिला पाहिजे तरच संघटना भविष्यात मजबूत होईल आणि संघटनेला ध्येय गाठता येईल त्यासाठी संघटनेची प्रामाणिक राहणं हे सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यासाठी बंधनकारक राहील असे मुख्य मार्गदर्शक रजाकशाहीद सर यांनी सुचवले.
तर संघटनेचे अध्यक्ष संपादक विलास चव्हाण म्हणाले की संघटनेचे ध्येय धोरण संघटनेचे तत्व पालन करणारा पदाधिकारी व सदस्य संघटनेला कधीच अडचणीत आणू शकत नाही परंतु संघटनेच्या उद्दिष्टाचे व तत्व चे बंधन न पाळणारा सदस्य किंवा पदाधिकारी हा संघटनेला अडचणीत आणू शकतो यावर गंभीर विचार होणे जरुरी आहे कारण आमची लढाई उमरखेड शहरातील प्रस्थापित पक्षांच्या व नेत्यांच्या विरोधात आहे. आम्ही जनतेला आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये तिसरा पर्याय म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासणारे जनतेसाठी प्रामाणिक काम करणारे वैचारिक उमेदवार द्यावे म्हणून पॅनल उभी करीत आहोत त्यामुळे प्रस्थापित पक्षाची आमचा कुठलाही संबंध नाही याची जाणीव सर्व पदाधिकारी व सदस्यांनी ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वांनी एकमताने काम करायला हवे त्यानंतर उपाध्यक्ष जयवंत मेने सर यांनी सांगितले की संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांची एकनिष्ठता व प्रामाणिकता तथा कर्तव्य तत्परता आम्हाला आगामी नगरपरिषद निवडणुकीत यशापर्यंत पोहोचू शकते याची जाणीव सर्वांनी ठेवणे जरूरी आहे यावर संघटनेचे पदाधिकारी डी.बी. राठोड म्हणाले की आम्ही सर्व मिळून प्रामाणिकपणे आगामी नगर परिषदेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू यावर सर्वांनी एकमताने काम करण्याच्या निश्चय केला काही सदस्य लवकर येऊन काम असल्यामुळे चर्चा करून निघून गेले तर काय सदस्य थोडे उशिरा आले परंतु वरील पदाधिकाऱ्यांना त्यांच्याशी त्याच्या वेळी सविस्तर चर्चा केली.
या मीटिंगमध्ये मुख्य सल्लागार उमाकांत मडके, मुख्य मार्गदर्शक रजाक शाहिद सर, अध्यक्ष - संपादक जय राजसिंहासन विलास चव्हाण उपाध्यक्ष जयवंत मेने सर पदाधिकारी डीबी राठोड प्रसिद्धी प्रमुख संपादक शेख इरफान सहसचिव अभिजीत चौधरी, संघटक संपादक शेख तहेसीन संजय चेके संपादक रितेश कदम पत्रकार सुरेंद्र दळवी पत्रकार सुनील लोखंडे पत्रकार गजानन वानखेडे शेख आयुबभाई सब्जी एजंट पत्रकार शेख नदीम, पत्रकार शेख ख्वाजा शेख मौला, ज्ञानेश्वर पाटील लोखंडे उपस्थित होते.





Social Plugin