प्रतिनिधी/प्रशांत सोनवणे
फलटण दि.२४ आजच्या या यांत्रिक तसेच प्रदूषणाच्या दुनियेमध्ये अनेक समस्या जाणवत आहेत. या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण पर्यावरणाची दखल व काळजी घेणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या या जतनासाठी तसेच संवर्धनासाठी फलटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यामधील असणारे वाठार निंबाळकर हे गाव त्याच्या ऐतिहासिक वारसा साठी प्रसिद्ध आहे. याच गावांमधील असणारे श्री.देवराज जगन्नाथ शेंडे व सौ.संगीता देवराज शेंडे या उभयंतांनी पर्यावरणाचे जतन व संरक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष कृती मधून संदेश देण्याचे योजले आहे. एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमांतर्गत हे कुटुंब महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका ते भारतातील सुप्रसिद्ध असणारे अमरनाथ तीर्थक्षेत्र हा तब्बल 2370 किलोमीटर आंतर असणारा मार्ग सायकलने प्रवास करण्याचे योजले आहे. वास्तविक पाहता सायकलने एवढे प्रचंड अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे याची कल्पना आहे. परंतु या कुटुंबाने यापूर्वीही असेच उपक्रम हाती घेऊन त्याच्यामध्ये सुंदर अशी कामगिरी केलेले आहे.
त्यामुळे खात्री आहे की त्यांची ही यात्रा सुद्धा अतिशय यशस्वी व कोणत्याही अडचणी शिवाय पूर्ण होणार आहे.फलटण तालुक्यातील नागरिकांना याचा अभिमान आहे त्यांच्या या प्रवासासाठी व पुढील वाटचालीसाठी समर्थ प्रतिष्ठान फलटण यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांचा हा पर्यावरणाचा संदेश भारतातील प्रत्येक नागरिकांना पर्यंत पोहोचावा हीच मंगलमय शुभकामना दि.24/6/2024 रोजी समर्थ प्रतिष्ठान तर्फे यांना प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी माजी नायक तहसीलदार मा.श्री. नंदराज भोईटे यांच्या हस्ते त्यांना प्रतिष्ठानचे पत्र देण्यात आले
त्यावेळेस प्राचार्य अंकारे सर, संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी अध्यक्ष भोलेनाथ भोईटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास सोडमिसे, तालुका अध्यक्ष बबन बनकर, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राष्ट्रीय संघटक हिंदुराव गायकवाड, आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष वीरसेन सोनवणे, हरी मामुलकर, डॉ. साळेअशोक भगत, सातारा सम्राट चे संपादक गोविंद मोरे, सातारा साम्राज्य कार्यकारी संपादक प्रशांत सोनवणे, मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण चे मुख्याध्यापक मा. श्री रुपेश शिंदे, राजू इंगळे, सूर्यकांत भोसले, संतोष दगडे, संतोष भोईटे, बाळासाहेब डोईफोडे, अमित साळुंखे, तेजस पवार, प्रशांत शिंदे, रमेश भोईटे, सचिन शेळके, विठ्ठल बनकर, मधु बनकर, सूर्याजी जगताप, सचिन वाघ, रुपेश नेरकर,बाळासाहेब जाधव, युवराज चोपडे, दिनेश रासने, माधु पवार, निलेश गायकवाड, समर्थ प्रतिष्ठानचे सचिव गणेश भोईटे, हे सर्व उपस्थित होते व त्यांना शुभेच्छा दिल्या





Social Plugin