बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव
आधुनिक तंत्रज्ञानाने मराठवाड्यातील नावाजलेली जालना येथील प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक म.जालना शहागड शाखेचा भव्य शुभारंभ माजी आमदार श्री.शिवाजीराव चोथे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
या उदघाटन समारंभाच्या कार्यक्रमास बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. आ.ॲड श्री.विलासबापू खरात साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री धर्मराज विश्वनाथ हरेर अध्यक्ष व्यापारी महासंघ शहागड,प्रमुख उपस्थिती मा.श्री जफर तांबोळी उपाध्यक्ष व्यापारी महासंघ शहागड,मा.श्री महेशजी गिल्डा उपाध्यक्ष व्यापारी महासंघ शहागड तसेच प्रियदर्शनी बॅंकेचे चेअरमन सी.ए श्री.भूषणजी भक्कड ,मा.श्री विश्वजीत दादा खरात सदस्य बोर्ड ऑफ मॅनेजमेंट,श्री.बळीराम जिगे व्हा. चेअरमन,श्री.सचिनजी वाणी सर मुख्य कार्यकारी अधिकारी शाखाधिकारी मा.नितीन बोबडे सर्व संचालक मंडळ,कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,खातेदार शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रियदर्शनी बँक हि गेल्या 30 वर्षापासून जनतेची अविरत सेवा करत आलेली आहे.बँकेने उत्कृष्ट काम केल्याबद्दल विविध क्षेत्रातील 80 पेक्षा जास्त बँकिंग पुरस्कार प्राप्त केले आहेत.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्यामागास एकूण 315 बेरोजगार लाभार्थ्यांना एकूण 26 कोटी रुपयांचे कर्ज उद्योग उभारणीसाठी वाटप करण्यात आले आहे.बँकेची 07 वी शाखा शहागड येथे ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू आहे तरी ग्राहकांनी बँकिंग सेवेचा लाभ घ्यावा अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.श्री विलासबापू खरात चेअरमन सी.ए श्री भूषणजी भक्कड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सचिनजी वाणी यांनी दिली आहे*.





Social Plugin