नांदेड / भारत वानरे
नांदेड शहर येथील राज्य परिवहन महामंडळ विश्वासू प्रवासी संघटनेच्या वतीने माजी राज्यमंत्री डी .पी.सावंत याचा सत्कार करण्यात आला आणि त्यांनी नांदेड येथील मुख्य बस स्थानकाला भेट दिली होती व प्रवाशाना त्याच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले होते . त्यावेळेस विश्वासू प्रवासी संघटनेच्या वतीने त्यांना रेल्वे स्टेशन ते बस स्थानक पर्यंत रस्ता हा प्रलंबित असून त्यासाठी आपण पाठपुरावा करावा असे संघटनेने त्यांना विनंती केली असता त्यांनी सदरील यंत्रणेला पाठपुरावा करून हे काम करण्याचे आदेश दिले.
तसेच बसस्थानक इतररत्र हलवुन या कामाची सुरुवात होत आहे म्हणून माजी राज्य मंत्री डी .पी.सावत याचा सत्कार करतेवेळी विश्वासू प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर ,उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर ,सहसचिव रमाकांत घोणसीकर ,भारत वानरे व तसेच इतर मान्यवराणी साहेबाचे अभिनंदन आणि सत्कार करून त्याचे आभार मानले





Social Plugin