=
अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विज्ञानासारख्या शाखेमध्ये मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये पीएचडी मिळवली आहे. संशोधन काळामध्ये अनेक अडथळे कौटुंबिकआर्थिक अडचणी आलेले असताना देखील त्यांनी आपले संशोधन कार्य अत्यंत जोमाने पूर्ण केले. बायोटेक्नॉलॉजी विषयात इन विट्रो कल्चर स्टडी आणि अँटीकॅन्सर ॲक्टिव्हिटीचे मूल्यांकन ऑफॅस्क्लेपियास कुरासाविका एल. हा संशोधन प्रकल्प कार्य पूर्ण झाली आहेत. सदरील प्रबंध मुंबई विद्यापीठ पी एच.डी. (विज्ञान) पदवी प्रदान वर्षा शेळके यांनी सादर केला होता. त्याना
मार्गदर्शक म्हणून डॉ सौ.मीता बोत विभागप्रमुख वनस्पतिशास्त्र विभाग, बी.के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण यांनी केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबातील सदस्य, नातलग, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरीक यानी शुभेच्छा देऊन अभिनंदन केली आहे





Social Plugin