प्रतिनिधी संजय भरदुक मंपीर
ग्राम गाववळ येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र गायकवाड यांच्या नैसर्गिक शेतामध्ये केसर आंबा फळ पिकाचे नुकसान करत असताना नीलगाय आदळली असता नील गाईच्या मागे कुत्र्यांची झुंड लागली होती कुत्र्यांचा आवाज ऐकून रवींद्र गायकवाड हे घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्यानंतर असे लक्षात आले की सदर नील गाईला व्यवस्थित पडता येत नाही तसेच तसेच तिच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे त्यामुळे ती चावराबावर करत होती व रवींद्र गायकवाड यांच्या वतीने हमला चढवण्याचा प्रयत्न केला
पाहून रवींद्र गायकवाड यांनी नील गाईला दोराचा फास्ट टाकून बांधून ठेवले व तिला प्रथम दर्शनी पाणी व ढेप चारून तृप्त केले व तातडीने गायवळ ग्रामपंचायत सरपंच सतीश पाटील राऊत यांना घटनेची माहिती देऊन ग्राम गायवळ सरपंच यांनी तातडीने वनविभाग कारंजा यांना माहिती दिली व ग्राम गाववळ येथील युवक देऊ पाटील गायकवाड, नवरा भाऊ नीचळे ,संतोष पाटील गावंडे, अमोल इंगळे ,संतोष राठोड श्री सतीश पाटील राऊत यांच्या परिश्रमातून व प्रगतशील शेतकरी रवींद्र गायकवाड यांच्या समय सुचकतेतून आज वन्यप्राणी नीलगाय कुत्र्यांच्या शिकारीतून सुटका झाली
तिला पुढील उपचाराकरता वनविभाग कारंजाचे वनरक्षक श्री शिंदे साहेब व त्यांची सहकार्य टीम यांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्राम गायवळ येथील युवकांच्या मदतीने नील गाईला गाडीमध्ये सुव्यवस्थित टाकण्यात आले व पुढील उपचाराकरता रुग्णालयामध्ये घेऊन गेले. सदर नील गाईच्या डाव्या पायाला मोठी जखम झालेली असून त्या जखमेमध्ये किडे पडलेले असू शकतात करिता तिला जोरात पडण्यास त्रास होत होता या त्रासामधून तिला मुक्ती मिळावी व तिचा योग्य उपचार व्हावा या हेतूने सदर निलगायला पुढील उपचारा करता वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले....... शेतकरी रवींद्र गायकवाड





Social Plugin