प्रतिनिधी आकाश जळके
अंबड
अंबड जालना रोडवर हरतखेडा पाटी जवळ दोन दुचाकीचा भीषम अपघात झाला आहे . या दोन्ही दुचाकीचा सेंदामेंदा झाला आहे .ही घटना 10 जून रोजी दुपारच्या वेळेस घडली यातील जखमींना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले यातील दोघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती मिळते आज दुपारी दीड ते दोन च्या सुमारास अंबड जालना रोडवरील हरतखेडा पाटीजवळ दुचाकी क्रमांक mh 20 dw9499 व mh21 bw 0102 या दोन दुचाकीचा भीषम अपघात झाला आहे.या चौघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे .त्यांना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान त्यातील दोघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाचन, पोलीस उपनिरीक्षक स्कॉट, जमादार वनवे ,हेड कॉन्स्टेबल फलटण आदींनी भेट दिली.





Social Plugin