प्रतिनिधीदीपक गुरव@ चाळीसगाव
शहर पोलिसांची मोठी कारवाई अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या इसमाला वाहनासह ताब्यात घेत तब्बल ५० किलो गांजा व वाहन जप्त करण्यात आले आहे.आरोपी अशोक भरतसिंग पाटील वय ५४ वर्षे धंदा ड्रायव्हर रा. प्लॉट नं. ३८, शिक्षक कॉलनी, चाळीसगांव हा चाळीसगांव शहरामध्ये अवैध रित्या गांजा विक्री करित असल्याबाबत माहीती मि ळाल्याने मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, मा.अपर पोलीस अधिक्षक सो. श्रीमती कविता नेरकर (पवार) यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे तसेच मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांची परवानगी घेवुन पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी जितेंद्र धनराळे, निवासी नायब तहसिलदार, चाळीसगांव, पोउनि सुहास आव्हाड, पोहेकॉ सुभाष घोडेस्वार, पोहेकॉ राहुल भिमराव सोनवणे, पोहेकॉ विनोद विठ्ठल भोई, पोना महेंद्र प्रकाश पाटील पोकॉ आशुतोष दिलीप सोनवणे, पोकॉ ज्ञानेश्वर हरी पाटोळे, पोकों पवन कृष्णा पाटील, पोकॉ विजय रमेश पाटील, पोकों ज्ञानेश्वर विलास गिते, पोकों मनोज मोरसिंग चव्हाण, पोकॉ राकेश मुरलीधर महाजन, पोकों रविंद्र निंबा बच्छे, म.पो.शि. स्नेहल मांडोळे, सर्व. नेम चाळीसगांव शहर पो. स्टेशन तसेच फोटोग्राफर अनिकेत जाधव, वजन माप करणारे प्रविण जगन्नाथ वाणी, रा. चाळीसगांव यांच्यासह आरोपीस सुमारे १० लाख ६ हजार ३०० रुपये किमतीच्या ५० किलो ३१५ ग्रॅम गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण २२ लाख ६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक, सुहास आव्हाड व पोकों/उज्वलकुमार म्हस्के नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.





Social Plugin