प्रतिनिधी आकाश जळके
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक शाखा अंबड येथे फिक्स डिपॉझिट स्वप्नपूर्ती ठेवी योजना व बचत खात्यामध्ये एकत्रित ठेवलेली रक्कम 21,91,167 रुपये बँक देण्यास टाळाटाळ करीत असून बँकेने आमची फसवणूक केली असल्याच्या डॉक्टर लक्ष्मण सावंत यांच्या तक्रारी वरून अंबड पोलीस ठाण्यात रविवारी (ता.16) सुरेश कुठे यांच्यासह पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या संदर्भात दिलेल्या फिर्यादीत डॉक्टर लक्ष्मण सावंत यांनी म्हटले आहे की ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा अंबड चे व्यवस्थापक पदाधिकारी यांच्यावर विश्वास ठेव तसेच त्यांनी आम्हाला जाहिराती च्या माध्यमाद्वारे फिक्स डिपॉझिट वर जास्त व्याज मिळते असे आम्हीच दाखवल्याने मी व माझी पत्नी अशा आम्ही दोघांनी वेळोवेळी ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक सोसायटी शाखा अंबड येथे फिक्स डिपॉझिट व स्वप्नपूर्ती ठेवी योजना व बचत खाते मध्ये एकत्रित 21,91,167 रुपये रक्कम ठेवलेली होती. ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह (सोसायटी) ल. बीडचे चेअरमन श्री सुरेश कुटे ,व्हॉइस चेअरमन यशवंत कुलकर्णी ,बँकेचे संचालक मंडळ वरील आशिष पाटोदेकर, जिल्हा व्यवस्थापक रमेश जोगदंड व अंबड शाखेचे मॅनेजर विजय ढोणे ,व सुरेश कुठे यांच्यासह लोकांनी आजपर्यंत आमचे फिक्स डिपॉझिट व स्वप्नपूर्ती ठेवू योजना व बचत खात्यात जमा असलेले पैसे परत केलेले नाही. व आमची आर्थिक फसवणूक करून सोसायटीची बँकिंग सेवा देण्यास कसूर केला आहे.
याप्रकरणी डॉक्टर लक्ष्मण सावंत यांच्या फिर्यादीवरून ज्ञान राज्याचे चेअरमन सुरेश कुठे यांच्यासह पाच जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात 420,409,34 तसेच महाराष्ट्र ठेविदाराच्या वित्तीय संस्था मधील इतर संबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 नुसार तीन चार पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Social Plugin