बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] ."5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त" सातारा जिल्हा कारागृहामध्ये सातारा वन विभाग यांचे अधिकारी व एचडीएफसी बँक येथील अधिकारी यांच्या सहयोगाने वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन" साजरा करण्यात आला.
कारागृहाच्या आतील शेतीच्या बाजूने फळझाडांचे उत्पन्न वाढावे तसेच कारागृहातील बंद्यांना शेतीकाम व फळझाडांची शेती करता यावी या दृष्टीने सातारा कारागृह प्रशासन, वन विभाग व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा, जांभूळ, फणस, बदाम, आवळा, लिंबोणी" अशी विविध प्रकारची झाडे लावून जागतिक पर्यावरण पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमास महेश झांजुर्णेसाहेब, सहायक वनसंरक्षक, वनीकरण व कॅम्प,सातारा वनविभाग, अभिजीत माने
परि.वनपरिक्षेत्र अधिकारी ,सातारा वनविभाग, क्लस्टर हेड सातारा एचडीएफसी सचिन देव,
युनिट हेड प्रशांत भोसले, सचिन पाटील, राहुल कुलकर्णी तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार पारधी, शिपाई तुकाराम घुटुकडे, शिपाई अहमद संदे व इतर कारागृहातील बंदी हजर होते.





Social Plugin