Ticker

6/recent/ticker-posts

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू: अन्न-पाण्याचा त्याग



प्रतिनिधी आकाश जळके 

      राजकारण माझा मार्ग नाही आणि मला त्यात जायचे ही नाही.मराठा समाजाला आरक्षण मिळावे ,हीच मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत अमरन उपोषण करणार आहे.सरकारने तातडीने सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी मागणीनुसार प्रमाणपत्र द्यावे मागणी मान्य झाली नाही तर विधानसभा निवडणूक सर्व जाती धर्माचे उमेदवार  देणार आणि तेव्हा नाव घेऊन उमेदवार पाडणार असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते  मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी अंतरवाली सराटी येथे दिला.

      सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून आठ जून रोजी अन्न पाण्याचा त्याग करून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले . 

         आमदाराने प्रश्न मांडावा आमचे उपोषण सुरू झाले की काही आमदार ओरडतात त्यामुळे भाजप सेनेच्याही नव्हे तर सर्वपक्षीय आमदाराने आपल्या नेत्याकडे मराठा आरक्षणाचा विषय मांडून तो तातडीने मार्गे काढण्या साठी पाठपुरावा करावा असे आव्हान  मनोज जरांगे पाटील यांनी केले.