Ticker

6/recent/ticker-posts

सर्वांगीण विकास, टँकर मुक्त जिल्ह्यासाठी प्रयत्न व्हावेत



प्रतिनिधी आकाश जळके 

अंबड

        महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याण काळे यांना अंबड तालुक्यातील चांगले मताधिक्य मिळाले आहे.त्यामुळे त्यांच्याकडून पाणी प्रश्न, जालना ते वडीगोद्री महामार्गाला गेलेले तडे, अभियांत्रिक महाविद्यालय, एमआयडीसी,  सिंचन, रस्ते ,आरोग्य, यासह विविध प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा अंबड येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

       जालना लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी कडून रावसाहेब दानवे, तर महाविकास आघाडी करून काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे हे प्रतिस्पर्धी होते. यात डॉ.कल्याण काळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. अंबड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला असून, अंबड शहराला जालना पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे अंबर शहरासाठी अमृत जल योजना प्रस्तावित असून, ही योजना पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच सध्या शहरातील रस्त्यांची झालेली चाळण शहरातून अवजड वाहनांची वर्दळ वाढलेली असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्या सोडवण्यासाठी नवनिर्वाचित खा .कल्याण काळे यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहे.

        तालुक्यातील बरसा भाग चिंच आभारी कोरडवाहू आहे. जामखेड रोयला गड पारनेर तडगाव या भागात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे प्रकल्प उभारणे आरोग्य विभागाचे रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागा, कृषी, शिक्षण विभागासारखे महत्त्वाच्या विभागात असलेल्या रिक्त जागा भरणे, गाव खेड्यांना जोडणारे रस्ते दर्जेदार करण्यासाठी खासदार कल्याण काळे प्रयत्न करणार का, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

       विशेष म्हणजे सध्या जिल्हाभरात असलेले पाण्याचा प्रश्न तीव्र होत आहे त्यावर देखील कायमस्वरूपी मार्ग काढणे जिल्हा टँकर मुक्त करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची खासदार काळे यांच्याकडून आहे.

           निर्वांचीत खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना अंबर तालुका यातून चांगले मताधिक्य मिळाले  आहे.मतदारांनी मोठ्या विश्वासाने भक्कम साथ दिली.तालुक्यातील रखडलेल्या कामा व नवीन प्रकल्प खासदार कल्याण काळे यांचे पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारी योजना , मलनि: सारण केंद्र ही रखडलेली कामे पूर्ण होतील ,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे-   शिवप्रसाद चांगले माजी नगरसेवक नगरपरिषद अंबड.