Ticker

6/recent/ticker-posts

पंकजाताई मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी बिबी शहर कडकडीत बंद.


प्रतिनिधी--माणिक चव्हाण

लोणार तालुक्यातील बिबी येथे दिनांक 9 जून 2024 रोजी पंकजाताई मुंडे यांच्या आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या मुळे बिबी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला होता मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील युवक अनिकेत सरकटे याने लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी महाराष्ट्रातील तमाम मुंडे समर्थकांसह समाजाच्या भावना दुखावल्या होत्या त्या निषेधार्थ लोणार तालुक्यातील बिबी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदला सर्व व्यापारी व सर्वंच समाजाने पाठिंबा दिला