Ticker

6/recent/ticker-posts

सहकुलसचिव डॉ. राहुल नरवाडे यांचे मिलिंद महाविद्यालयात मार्गदर्शन



बाळासाहेब पवार प्रतिनिधी 

उमरखेड तालुक्यातील मिलिंद महाविद्यालय मुळावा येथे डॉक्टर राहुल नरवाडे सहकुलसचिव परीक्षा विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी सत्राआरंभी महाविद्यालयात येऊन विविध विषयावर मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात परीक्षेदरम्यान येणाऱ्या अनेक अडचणी बाबत माहिती दिली तसेच सी बी सी एस मध्ये काही महत्त्वपूर्ण झालेले बदल याबद्दलही माहिती दिली यावेळी त्यांच्यासोबत मधुकर मुनेश्वर, सुभाष नरवाडे, उत्तम शिंगणकर उपस्थित होते

 याप्रसंगी डॉक्टर नरवाडे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास परीक्षा सह केंद्र अधिकारी प्राध्यापक माणिक बेंडके मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अनिल काळबांडे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप इंगोले राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक ज्योती काळबांडे पाली विभाग प्रमुख प्राध्यापक क्रांती मुनेश्वर पांडुरंग शिंदे लक्ष्मण केवटे रमेश ढोले गौतम वाघमारे इत्यादी कर्मचारी वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर विश्वास दामोदर यांनी केले महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्टी नंतर चा महाविद्यालयाचा पहिला दिवस हा डॉक्टर नरवाडे यांच्या मार्गदर्शनाने संस्मरणीय ठरला.