बडनेरा ( वार्ताहर ),
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या मार्गदर्शनात जिल्हा ॲमेच्युर स्पोर्ट कराटे डो असोसिएशन अमरावती, नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा (शारीरिक शिक्षण विभाग ), राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा, द फाइटर स्पोर्ट क्लब अमरावती च्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिर दिनांक 17 एप्रिल ते 9 जून 2024 पर्यंत स्थळ राजेश्वर युनियन हायस्कूल येते दो गांडू बडनेरा व अलंकार पार्क नवी वस्ती बडनेरा या ठिकाणी नुकताच संपन्न झाला सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये सेन्साई सोनल रंगारी सर यांच्या मार्गदर्शना मध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, उच्च स्थान मिळावे म्हणून शारीरिक तंदुरुस्ती, व्यायाम, कराटे ,योगा ,मार्शल आर्ट, शिवकालीन मर्दानी खेळ, रोपस्केपिंग, व्यक्तिमत्व विकासा बद्दल प्रशिक्षण देण्यात आले
या प्रशिक्षण शिबिराचा समारोपिय कार्यक्रम नुकताच सार्वजनिक कपिल बुद्ध विहार बडनेरा च्या प्रांगणा मध्ये नुकताच संपन्न झाला. सदर समारोपीय कार्यक्रमां मध्ये कराटे संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रा .खुशाल अलसपुरे सर, पूज्य भंते नागसेन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आयुष्यमान नितीन भाऊ कदम, आयु.राजकुमार खडसे सर ,आयु. आकाश मेश्राम,पास्टर याकूब इंगळे हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
या समारोपिय कार्यक्रमां मध्ये शिबिराथी यांनी जे प्रशिक्षण घेतले त्याचे प्रात्यक्षिक करून उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच गणमान्य अतिथींचे मने जिंकून घेतले कारण की विद्यार्थ्यांनी खूपच सुंदर असे चितथरारक असेल शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्याशिक सादर केले तसेच कराटे , लाठी काठी,रोप स्किपिंग चे सुद्धा विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले, साई स्पोर्ट व म्युझिकल अमरावती चे संचालक श्री राजेश लवणकर यांच्या तर्फे सहप्रशिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर शिबिरा करता जिल्हा क्रीडा अधिकारी श्री गणेश जाधव सर ,क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने सर,श्री राजेश वडते सर, श्री दीपक संमुद्रे सर, श्री संजय पांडे सर ,वैशाली इंगळे मॅम, बंत्ते मॅम ,श्री शुभम मोहतुरे ,श्री गणेश तांबे , शेख अकील सर, श्रीमती प्रणिती भिंमटे ताई यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
सदर शिबिर सोनल रंगारी सर यांच्या मार्गदर्शनात आर्यन जैन, अल्पेश वानखडे, आर्यन नागदिवे, मानव चव्हाण, अभय वावगे अनिकेत गाले , कुमारी राधिका गणवीर ,शर्वरी नागदिवे ,समृद्धी निमगडे ,गौतमी टेंभुर्णी खुशी डोंगर यांनी सह प्रशिक्षक म्हणून कार्य पाहिले





Social Plugin