शासन शिक्षणावर लाखो रुपये खर्च करते परंतु अंबड तालुक्यातील दाढेगाव जिल्हा परिषद शाळा ची इमारत शेवटची घटका मोजत आहे. तरी शालेय समिती व गट शिक्षणाधिकारी यांना कोणतेच सोयर सुतक नाही सविस्तर वृत्त असे की राजू दशरथ काकडे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले असून जि.प. प्रा. शाळाची इमारत मोडकळीस आली असून शाळेची इमारत कधी कोसळेल याची कल्पना करता येत नाही
तरीही विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहे प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे त्यामुळे काही दिवसात शाळेचे इमारतीची दुरुस्ती किंवा नवीन इमारत न बांधल्यास जि. प. प्रा. शाळेच्या पत्र्यावर बसून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा राजू काकडे यांनी निवेदनाद्वारे दिला





Social Plugin