बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
हनुमान विद्यालय निढळ ता. खटाव येथे नवीन शैक्षणिक वर्षांत नवागताचे स्वागत करणेत आले. प्रारंभी वाद्यांच्या गजरा मध्ये नवप्रवेशीत विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणातून हॉल पर्यत आणणेत आले. यावेळी इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत च्या विद्यार्थ्याना मोफत पाठय़पुस्तके वितरण प्रमुख मान्यवरांचे शुभ हस्ते करणेत आले. नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत वही पेन देऊन करण्यात आले.
त्या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक निर्मळ सर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य ,विविध समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ ,पालक ,शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी S. S. C बॅच 94/95 तर्फे विदयालयास फॅन भेट देण्यात आले कांबळे एस. एन. यांनी सुत्रसंचालन केले देशमुख एम. एम. यांनी आभार मानले





Social Plugin