Ticker

6/recent/ticker-posts

सैनिकांच्या सन्मानातून घडते देशभक्तीचे दर्शन -मोहनराव गुरव , बुध येथील निवृत्त ऑन . कॅप्टन धनाजी जगदाळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात


बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

देशभक्तीने भारावलेले युवक  मातृभूमीच्या प्रेमामूळे सैन्यदलात सामील होतात . तिच्या रक्षणाकरता सर्वोच्च बलीदान दयायला तयार असतात . त्यांच्या त्यागातून, सतर्केतून देशात शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते .सैनिकांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असून त्यांच्या सन्मानातून देखील आपल्या देशभक्तीचे दर्शन  घडते . असे विचार प्रसिद्ध निवेदक , मुख्याध्यापक  मोहनराव गुरव ( सर ) यांनी व्यक्त केले .                       

       बुध ता . खटाव येथे बुध ग्रामस्थ व आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित बुध नगरीचे सुपूत्र ऑन. कॅप्टन श्री धनाजी शंकर जगदाळे हे ७ मराठा लाईट इन्फन्ट्री मधून ३० वर्षाची देशसेवा बजावून निवृत्त झाले . त्यांच्या सेवापूर्ती समारंभात प्रमूख् पाहुणे म्हणून ते बोलत होते . अध्यक्षस्थानी माजी सैनिक श्री रघुनाथ कुंभार होते .          

   यावेळी बुधच्या लोकनियुक्त सरपंच सौ . सुजाता बोराटे , उपसरपंच व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयसिंह राजेघाटगे , माजी सरपंच बाळासाहेब इंगळे , अशोकराव पुरे , हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता . का . सुर्यवंशी , माजी प्राचार्य बबनराव फडतरे , पीएसआय सुभाष फडतरे , बाळासो  जगदाळे ,  माजी उपसरपंच सुधीर जगदाळे ,पैलवान नवनाथ फाळके ,अभय जगदाळे , व ग्रामस्थ उपस्थित होते .             

           गुरव पुढे म्हणाले की , भारताच्या सीमेवर अहोरात्र गस्त घालणाऱ्या सैनिकांमुळेच देशातील जनता सुखाने झोपू शकते , हे वास्तव आहे . अतिशय खडतर परिश्रम घेऊन प्रत्येक सैनिक आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करत असतात . देशसेवा करणारे सैनिक हेच खरे हिरो असून त्यांच्यामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे .                   उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे म्हणाले , सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो . देशाच्या रक्षणासाठी आपल्या जिल्ह्याने नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे . आजही आपल्या जिल्हयातील हजारो सैनिक देशरक्षणासाठी अहोरात्र कर्त०य बजावत आहेत . सैनिक हेच आपल्या देशाचे खरे हिरो आहेत . अतिशय खडतर जीवन जगून सैनिक आपले  कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडत असतात . अशा खऱ्याखुऱ्या  हिरोना माझा सलाम !           यावेळी ता . का . सुर्यवंशी , अशोकराव पुरे , प्रथमेश फाळके यांनी आपले मनोगते व्यक्त केली .       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी प्राचार्य के .डी. पवार यांनी केले .आभार नितीन गाडे यांनी मानले .            यावेळी दिनकर च०हाण , अर्जुन गायकवाड , जालिंदर सुर्यवंशी , ग्राम पंचायत . सदस्य जयवंत जगदाळे , गणेश सातपुते , राहुल कदम , संतोष जगदाळे , हिंदुराव जगदाळे , श्रीधर जगदाळे , तुळशीराम जगदाळे , दिलीप कदम , शिवाजी देसाई , अनिल जगदाळे , बाळकृष्ण घाटगे  , आजी -माजी सैनिक संघटना , विविध मान्यवर , पंचक्रोशीतील ग्रामस्थ व जगदाळे कुटुबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .                चौकट = सकाळी ऑन . कॅप्टन धनाजी जगदाळे व त्यांच्या पत्नी सौ उषादेवी जगदाळे यांची सजवलेल्या ओपन  जिप्सीमधून हलगी व तुतारीच्या निनादात, फुलांच्या वर्षावात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली . त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला .