प्रतिनिधी (आकाश जळके ) .
पळून आलेले प्रेमीयुगलास जालना पोलिसांनी ताब्यात घेतले प्रेमीयुगलास मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटची कामगिरी
मध्यप्रदेश राज्यातील नीमच जिल्ह्यातील रतनगढ येथील एका अल्पवयीन 17 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच सुकलाल मोहनलाल भिल्ल या तरुणाने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रतनगढ पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी दाखल झाली होती.दरम्यान, हे प्रेमीयुगल एका खाजगी बसने मध्य प्रदेशातून जळगावमार्गे जालन्याकडे येत असल्याची माहिती निमची जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातून जालना पोलिसांना देण्यात आली होती.
त्याअनुषंगाने अँटी ह्युमन ट्रॅफिक युनिटच्या पोलीस पथकास सतर्क करण्यात आले होते.मध्य प्रदेश पोलिसांनी कळविलेल्या खाजगी बसमधून न येता त्याच कंपनीच्या दुसऱ्याच बसमध्ये या प्रेमीयुगलाने प्रवास करून, जालना पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला.
संभाजीनगर रोडवरील नागेवाडी टोलनाक्यावर मध्यप्रदेशातून जळगाव मार्गे आलेल्या सर्व बस पोलीस पथकाने तपासणी करून, लाला ट्रॅव्हल्सच्या एका बसमधून काल दुपारी 4 वाजता या प्रेमीयुगलास ताब्यात घेतले. दरम्यान, आज सांयकाळी रतनगढ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अर्पिता बोहरा यांच्या पथकाने या प्रेमीयुगलास जालन्यात येऊन, ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा गिरी, पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी, सहायक फौजदार संजय गवळी, जगन्नाथ जाधव, महिला अंमलदार पुष्पा खरटमल, संगीता चव्हाण, आरती साबळे, रेणुका राठोड, चालक संजय कुलकर्णी आदींनी ही कामगिरी केली आहे.





Social Plugin