Ticker

6/recent/ticker-posts

चांभई येथे PDKV 100-39 अंबा या वाणाची सोयाबीन लागवड



प्रतिनिधी संजय भरदुक मंपीर 

मंगरूळपिर तालुक्यातील चांभई गावातील श्री दिलीपराव फुके आदर्श शेतकरी व कॄषी पुरस्कार प्राप्त तसेच बीबीएफ पेरणी प्रसारक असून शेती मध्ये नवं नवीन प्रयोगशील शेतकरी आहेत तरी यावर्षी त्यांनी १८ जून ला नवीन च डॉ.पंजाबराव कॄषी विद्यापीठ अकोला यांनी २०२१ ला प्रसारित झालेली PDKV(एएमएस 100--39 अंबा) ब्रीडर ही सोयाबीन या वाणाची ची टोकण पद्धतीने लागवड केली.ह्या वाणाला शेतकरी बांधवांची पसंती असून लवकर येणारे वाण ९५ ते १०० दिवसात येणारे वाण आहे.हेक्टरी उत्पादन २८ते ३० क्विंटल पर्यंत आहे .या वाणाच्या फुलांचा रंग जांभळा असून हा वाण मुळकूज/खोडकीडा या रोगास मध्यम प्रतिकारक असून चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक आहे.अशी शिफारस पि.डी.के.व्ही.अकोला विद्यापीठ ने केली आहे.