ग्रामीण प्रतिनिधी बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
केंद्र सरकारने १० हजार टन दूध भुकटी, ५ लाख टन मका, तीन लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाइंड मोहरी तेल आयातीचा अध्यादेश काढला. दुग्ध उत्पादक तसेच मका, सोयाबीन सह तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना हा निर्णय मारक ठरणार असल्याने केंद्र सरकारचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या अध्यादेशाची वडीगोद्री येथे होळी करण्यात आली.
केंद्र सरकारने बुधवारी अधिसूचना काढून मका, कच्चे सूर्यफूल तेल, रिफाइंड मोहरी तेल आणि दूध भुकटीची आयात शुल्क शून्य केले. आणि १० हजार टन दूध भुकटी, ५ लाख टन मका, तीन लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाइंड मोहरी तेल आयातीचा अध्यादेश काढला. या अन्यायकारक अध्यादेशाची होळी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली वडीगोद्री येथे होळी करण्यात आली.
या आयाती च्या निर्णयाचा थेट परिणाम दूध, मका आणि तेलबियांच्या भावावर होणार आहे. दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असतानाच आयातीमुळे भुकटीचे भाव कमी झाले. या निर्णयामुळे दूध दरातही ३ ते ४ रुपयांपर्यंत घट होणार असल्याने दूध उद्योगात तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 'या सरकारचा करायचं काय खाली डोके वर पाय'. 'धिक्कार असो धिकार असो केंद्र सरकारचा धिक्कार असो'. 'मागे घ्या मागे घ्या आयातीचा निर्णय मागे घ्या' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ,तालुकाध्यक्ष उमेश पाष्टे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब दखणे अंकुश तारख, बप्पासाहेब काळे, भारत उंडे आदींची उपस्थिती होती.
सोयाबीन आणि कापूसाला दर मिळत नसल्याने विक्री अभावी अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात पडू आहे. आणि त्यातच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी हा निर्णय घेवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा धोरण चालवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल..... सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना





Social Plugin