ग्रामीण प्रतिनिधी: शंकर निंबारे, देवडोंगरी
हरसुल | भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तालुका हरसूल विभाग. आदरणीय भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेतली त्यानिमित्ताने हरसुल येथे संध्याकाळी सहा 7 वाजत सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी हरसुल बिरसा मुंडा चौक येथे फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयराम भाऊ भुसारे हरसुलचे व्यापारी कांतीलाल शेठ लोखंडे, प्रतिष्ठित व्यापारी हिरामण गावित, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सतीश भाऊ दुसाने, तालुका सरचिटणीस अशोक भोये, तालुका सरचिटणीस सुनंदाताई टोपले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुमित्रा वड, माजी सरपंच धनराज खेडूलकर, तुकाराम देशमुख, हनुमंत तरवारे विशाल चौधरी व कार्यकर्ते मोदी समर्थक उपस्थित होते





Social Plugin