Ticker

6/recent/ticker-posts

वारा असो वा पाउस, सेवेसाठी सदैव तत्पर असतात महावितरणचे प्रकाशदुत.!



  वाई प्रतिनीधी  राहुल पिसाळ 


              ओझर्डे परिसरामध्ये वायरमन विक्रम चव्हाण आणि सुमित कांबळे यांनी भर पावसात तुटलेले वीज कनेक्शन जोडून आपल्या ग्राहकांनी गैरसोय होऊ नये म्हणून लवकर प्रयत्न करून कनेक्शन जोडून दिले ते देत असलेल्या सेवे मुळे संपूर्ण गावातून त्यांच्यावर वाह वाह चां वर्षाव होत आहे.

                    काल पासून वारे व संततधार पाऊस ,अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध राहावे. विजांचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी.आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी. जमिनीवर तुटून पडलेल्या विजतारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणाऱ्या विजतारांपासून सावध राहावे व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी असे आवाहन महावितरणातर्फे करण्यात आले आहे. यासह पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये अशी विनंती सर्व नागरिकांना करण्यात येतं आहे.