प्रतिनिधी आकाश जळके
दि.03/07/2024 रोजी सामाजिक वनीकरण आणि सावित्रीबाई फुले विद्यालय, अंबडच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने भालगाव परिसरातील डोंगरावर छोट्या मोठ्या काटेरी झुडपात 1250 सीडबॉल चे रोपण करण्यात आले.
सीडबॉल संदर्भात झनक घुसिंगे यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने *झाडे लावा झाडे जगवा* हे ब्रीद वाक्य लावून विद्यार्थ्यांना श्रमदान करण्याकरिता प्रेरीत केले. सीडबॉल रोपणाचे प्रशिक्षण देवानंद चित्राल सरांनी दिल्याने विद्यार्थ्यांनी उत्साहाने सीडबॉलचे रोपण केले.यावेळी अंबड सामाजिक वनीकरणचे झनक घुसिंगे यांच्या सह शाळेचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी,
मुख्याध्यापक मनोहर पटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिक निंबाळकर आणि देवा चित्राल यांनी परिश्रम घेतले.





Social Plugin