Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी रोपण केले सीड बॉल

                                        पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांचा भर पावसात अभिनव उपक्रम

प्रतिनिधी आकाश जळके

  दि.02/07/2024 रोजी सामाजिक वनीकरण आणि मत्स्योदरी इंग्लिश स्कूल च्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने घनसावंगी फाट्यावरील महादेव मंदिर डोंगरावर छोट्या मोठ्या काटेरी झुडपात टाकून भर पावसात 1200  सीडबॉल चे रोपण करण्यात आले.

      सीडबॉल संदर्भात श्री धनंजय मुळे यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने *एक वृक्ष आई साठी* ब्रीद वाक्य लावून विद्यार्थ्यांना भावनात्मकरीत्या श्रमदान करिता प्रेरीत केले. सीडबॉल रोपणाचे प्रशिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांनी उत्साहाने सीडबॉल चे रोपण करून पावसात ओलेचिंब भिजून आनंद लुटला. अंबड सामाजिक वनीकरणचे श्री धनंजय मुळे, श्री प्रल्हाद राठोड, श्रीमती तेजश्री ठेपे यांच्या सह शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती योगिता वरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रकाश शेरे, श्री अमोल राठोड, श्री आकाश म्हस्के, विद्यार्थी आणि देवा चित्राल यांनी परिश्रम घेतले.