लाभार्थ्यांच्या थम घेऊन धान्य देण्यास टाळाटाळ.
तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे
ओझरखेड | महाराष्ट्र शासनाने दर महिन्याला रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना तांदूळ , गहू इ. धान्य पुरवठा करत असुन नोंदणीकृत रास्त भाव दुकानदार मार्फत लाभार्थ्यांच्या थम घेऊन स्वस्त धान्य वितरण व्यवस्था करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत ओझरखेड येथील रेशन दुकानदाराने लाभार्थ्यांच्या थमने पावती घेऊन धान्य देण्यास टाळाटाळ केली. धान्य मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी चळवळ सुरू केली असता चालू जुन महिन्यात तुम्हाला धान्य मिळणार नाही. पुढील जुलै महिन्यात तुम्हाला धान्य मिळेल असे सांगून लाभार्थ्यांना रिकाम्या हाताने परत पाठवल्याने ओझरखेड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज वाजे यांनी (दि.२७) रोजी तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे रेशन दुकानदार प्रगती स्वयंसहायता महिला बचत गट, ओझरखेड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.





Social Plugin