प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर
आ. राजेश एकडे यांनी विधान भवनात मांडला कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभावाचा व व्यापाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीचा तारांकित प्रश्न(कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची सभागृहात केली घोषणा).
मलकापूर:- कापूस उत्पादनाचा खर्च वाढला असून शासनाने हमीभावाने खरेदी न केल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला असून शासनाने हमीभावाने खरेदी न केल्याने मलकापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकला व त्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून पळ काढला त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला असून मलकापूर व नांदुरा तालुक्यातील त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी असा शेतकरी हिताचा तारांकित प्रश्न विधानभवनात दि. ३ जुलै रोजी मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी शासनाला विचारून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी उत्तरात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची झालेली लूट व त्यांच्या आर्थिक नुकसान मान्य करून त्यांना मदत करण्याचे आमदार राजेश एकडे यांच्या तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना जाहीर केले.
मलकापूर मतदार संघात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून उत्पादन खर्च वाढल्याने तसेच कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकले आहेत. मागील वर्षी शासनाने हमीदराने कापसाची खरेदी न केल्याने शेतकऱ्यांनी अखेर अत्यल्पभावात खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकला त्यांनी कापूस विकत घेऊन शेतकऱ्यांना मालाचे पैसे दिले नाही. त्यामुळे आधीच लागलेला उत्पादन खर्च व व्यापाऱ्याने केलेली फसवणूक या गंभीर प्रश्नाकडे मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानभवनात शासनाचे लक्ष वेधले. या तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची झालेली फसवणूक मान्य करून त्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचे जाहीर केले. आमदार राजेश एकडे यांच्या तारांकित प्रश्नांमुळे मलकापूर मतदारसंघातील कापूस उत्पादक त्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





Social Plugin