Ticker

6/recent/ticker-posts

लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आनंदो प्लस प्रकल्प अंतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम


कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा: दिनांक ०७ जुलै २०२४ वार  रवीवार रोजी शंभू महादेव विद्यामंदिर येथे लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट या संस्थे अंतर्गत आनंदो प्लस प्रकल्पाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी साक्षी माने या विद्यार्थीनीने पार पडले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आनंदो प्लस प्रकल्पाचे सहाय्यक समन्वयक श्री प्रविण धाड हे होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बंजारा वस्तीगृहाचे अधीक्षक श्री भगवान सोनकांबळे, आनंदो प्रकल्पाचे सेंटर एक्झिक्यूटिव्ह मंठा श्री प्रभाकर कराळे व वाटुर गावचे प्रतिष्ठित नागरीक श्री पुरुषोत्तम जाधव व मंठा येथील अग्निशामक फायरमन श्री योगेश सूरोशे उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जालना विभाग दोनचे सहाय्यक समन्वयक श्री प्राविण धाड सर यांनी केले व सर्व उपस्थितांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजक आणि आयोजक म्हणून वाटुर सेंटरचे टास्कफोर्स टीम यांनी या कार्यक्रमाचे सूत्र सांभाळले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांनची उपस्थिती होती.