बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्हा कारागृहात, कारागृहातील बंद्यांचे आरोग्य, मानसिक व वैचारिक या बाबी सुयोग्य राहाव्यात यासाठी श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग टीम सातारा मार्फत आजपासून कारागृहातील बंद्यांसाठी “योगासने व हॅपिनेस प्रोग्रॅम”चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रोग्राम दररोज सकाळी तीन तास कारागृहातील 40 बंद्यांसाठी सातत्याने महिनाभर घेण्यात येणार आहे. या योगासने व हॅपिनेस प्रोग्रॅम साठी आर्ट ऑफ लिविंग चे योग गुरु श्री अर्जुन भोसले व श्री अविनाश पवार हे कारागृहात येऊन बंद्यांना शिकवण्यास सुरुवात केली आहे. पुढील महिनाभर कारागृहातील जवळपास सर्वच बंदी याचा लाभ घेणार आहेत. यामुळे बंद्यांच्या आरोग्यावर तसेच मनामध्ये चाललेल्या वाईट विचारांवर देखील चांगला परिणाम होताना दिसून येणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी “आर्ट ऑफ लिविंग” योगगुरु श्री अर्जुन भोसले, श्री अविनाश पवार, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, सीनियर जेलर ज्ञानेश्वर, राजेंद्र भापकर, सुभेदार महेंद्र सोनवणे, हवालदार दारकु पारधी तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Social Plugin