बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पालक म्हणून आई आणि वडील यांनी जन्माला येणाऱ्या बाळाबद्दलची जबाबदारी समजून घेणे आवश्यक असते. यासाठी प्रथम पालक तणावमुक्त असणे गरजेचे आहे. कारण ० ते ३ या वयोगटांतच बालकाचा भावनिक, शारीरिक, बौद्धिक, विकास होत असतो आणि याच वयात त्याच्यावर संस्कार होणे फार महत्त्वाचे आहे,' असे प्रतिपादन बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही.ए ओमासे यांनी केले.शिंदेवाडी येथील केदार मंगल कार्यालयात ० ते ३ वयोगटांतील मुलांच्या वाढीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खटाव (वडूज) यांच्यावतीने अंगणवाडी , डिस्कळ बीटचा आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना ओमासे बोलत होत्या.
मेळाव्याचे उद्घाटन डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते झाले . डिस्कळ बीटमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावतीने आयोजित केलेल्या ० ते ३ वयोगटातील मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, याचे महत्त्व पटवून देणारे स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यामध्ये मुलांना घरचा पौष्टिक व सकस आहार किती महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर त्याचे आरोग्य, त्याची घ्यावयाची काळजी, त्याच्या भाषा विकासाचे टप्पे, वासाचे ज्ञान, स्पर्शज्ञान, चवीचे ज्ञान तसेच सुरक्षित वातावरण आणि संवेदनशील पालकत्व आदी विषयांवर बोलके असे स्टॉल उभे होते. सुपरवायझर सौ . एम .आर. शेडगे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.
Social Plugin