Ticker

6/recent/ticker-posts

गुरुवर्य काळंगे विद्यालय मोळ येथे "एक झाड आईसाठी " उपक्रम



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 गुरुवर्य गणपतराव काळंगे माध्यमिक विद्यालय मोळ- मांजरवाडी विद्यालयात मोळ गावचे सुपुत्र पॉकेट कॅफे उद्योग समूहाचे संस्थापक, अभिजीत प्रतापराव राजेघाटगे व शिव विवेक प्रतिष्ठान ,मोळ यांच्या संयुक्त विद्यमानाने "एक झाड आईसाठी" या उपक्रमांतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते .

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे निसर्गतज्ञ, निसर्ग जागर प्रतिष्ठान पुणे, चे संस्थापक , 'बॅटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले आदरणीय डॉ.  महेश चंद्रकांत गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.गायकवाड साहेब व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी वृक्ष दिंडीचे आयोजन करून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसर ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर तसेच गाव परिसरात पाचशेच्या वर वृक्षांचे वृक्षारोपण केले यामध्ये वावळ ,भोकर  ,शिवण, करंज लिंब ,पिंपळ, वड ,जांभूळ अशा वेगवेगळ्या  देशी वाणाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा.श्री. अभिजित राजेघाटगे (युवाउद्योजक) यांनी केले, मुख्याध्यापक मा संजय गोडसे यांनी मार्गदर्शन केले , डॉक्टर श्री. महेश चंद्रकांत गायकवाड, श्री अभिजीत घाटगे, श्री रोशन उर्फ बंटी घाटगे, भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीपरावजी काळंगे साहेब,  सरपंच श्री. वैभव आवळे ,उपसरपंच श्री अरुण वाघ, उद्योजक कल्याणराव तावरे , अजय शितोळे ,.विश्वास गायकवाड साहेब,प्रकाश काळंगे साहेब,संपतरावं बोराटे साहेब, संदीप आगाशे साहेब,विलास घाटगे श्री.संदीप घाटगे,श्री.अमोल चिनके,श्री.संदीप काळे ,श्री.रितेश भंडलकर, श्री.कुंडलिक भंडलकर व इतर ग्रामस्थ ,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीपराव साबळे सर व आभार श्री. अमर यादव सर यांनी केले .