Ticker

6/recent/ticker-posts

बुध येथे आरंभ पालक मेळावा संपन्न



 पुसेगाव दि [प्रतिनिधी ]  

गरोदरपणापासून ते तीन वर्षापर्यंतच्या बालकांच्या संगोपनासाठी व सर्वांगीण विकासा साठी कुटुंब समाज माता पालक यांना सक्षम करणे यासाठी आरंभ पालक मेळावा घेण्यात आला . यामध्ये भाषा विकास, शारीरिक विकास, बौद्धिक विकास , खेळघर विज्ञाना अनुभव ,गणन पूर्व स्वच्छता आहार तयारी याच्या ऍक्टिव्हिटी  मांडण्यात आलेल्या होत्या .मातांना संवेदनशील पालक विषयी मार्गदर्शन करण्यात आले व मुलांच्या कडून प्रत्यक्षात खेळातून कृती करून घेण्यात आल्या 

.या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार महेश शिंदे यांच्या सौभाग्यवती पत्नी प्रिया शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच बुध गावच्या सरपंच सुजाता बोराटे , डॉ सोनल जाधव  यांनी मार्गदर्शन केले .बाल विकास प्रकल्प अधिकारी वर्षा उमासे यांनी  मातांना मार्गदर्शन केले .बुध गावचे माजी सरपंच अभयसिंह राजेघाटगे , सुजाता बोराटे, सुषमा कोरडे ,पोलीस पाटील रोहिणी कचरे ,पर्यवेक्षिका पवार मॅडम, देशमुख मॅडम बुध बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस  बुध गावातील गरोदर माता व शून्य ते तीन वयोगटातील लाभार्थ्यांच्या माता इत्यादी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार बुध  बीटच्या पर्यवेक्षिका एस . आर .काकडे  यांनी मानले