Ticker

6/recent/ticker-posts

देवडोंगरी येथील उपकेंद्र सोडले वा-यावर


तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे

देवडोंगरी | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महाराष्ट्र -गुजरात हद्दी लगत देवडोंगरी ग्रामपंचायतीचा आदिवासी बहुल भाग असून येथील उपकेंद्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका रिक्त पदे आहेत. तसेच प्रसाद जाधव यांनी नुकताच समुदाय आरोग्य अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे असे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे यांनी सांगितले. देवडोंगरी उपकेंद्रातील हि तीन महत्त्वाची पदे रिक्त झाली असून फक्त आरोग्य सेविका मदतनीस लक्ष्मीबाई निंबारे कार्यरत असल्याने उपकेंद्र वा-यावर सोडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

उपकेंद्रांतर्गत देवडोंगरी, बोरमाळ, गौळपाडा, सादडपाडा, रानपाडा, बाफणविहीर, बुगदपाडा, पाटाचामाळ, रानपाडा, जाबुळपाडा, माणिपाडा या गाव/पाड्यांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी असुन उपकेंद्रातील रिक्त पदांवरील आरोग्य कर्मचाऱ्यांची शासनस्तरावरून वेळेत नेमणुका होत  नसल्याने देवडोंगरी ग्रामपंचायत कडून तालुका आरोग्य अधिकारी त्र्यंबकेश्वर यांना पत्र दिले आहे. 

   पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे हिवताप, सर्दी-खोकला, अतिसार जुलाब अशा विविध संसर्गजन्य आजार उद्भवतात तसेच गावात उपकेंद्र असुन देखील गरोदर मातांना बाळंतपणासाठी आठ/नऊ किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचओहोळ येथे जावे लागते यामुळे गरोदर मातांची इतर पेसेंटची तसेच आदिवासी समाजाची खुप मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. या समस्या बाबत २४लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कडून यापूर्वी तालुका आरोग्य अधिकारी यांना कळविले होते. त्यावेळी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी जाधव हे एक दिवस येऊन गेले. त्यानंतर गावात बालमृत्यू झाल्याची खबर सदस्यांकडून तात्काळ कळविण्यात आली असून देखील उपकेंद्रात कर्मचारी हजर झाले नाही किंवा झालेल्या बालमृत्यूची दखल घेतली नाही. यामुळे ग्रामपंचायत गाव तसेच उपकेंद्र वा-यावर सोडल्याचा ग्रामस्थांकडून आरोप करण्यात येत आहे. असे पत्रव्यवहारात म्हटले आहे