बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये १७ परभणी लोकसभा मतदारसंघात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा घुंगर्डे हादगाव शाळेतील शिक्षक तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री. आप्पासाहेब उगले यांना परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित गुणगौरव कार्यक्रमात परभणी जिल्हाधिकारी मा.रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आप्पासाहेब उगले यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आप्पासाहेब उगले यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावामुळे निवडणुकीतील प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुयोग्यता राखता आली असल्याचे सांगितले. श्री. उगले यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला व ही कामगिरी त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि मतदारांच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्याचे नमूद केले. त्याचबरोबर आगामी निवडणुकांमध्येही अशाच प्रकारे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.





Social Plugin