ग्रामीण प्रतिनिधी: स्वरूप सुरोशे
पोहंडूळ ग्रामपंचायत मधील हनुमान वार्डातील नागरिकांच्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायत मधील सरपंच व माजी सरपंच,ठेकेदार यांच्या मिली भागतनुसार निधी काढून मस्टरवर नालीचे बांधकाम पूर्ण झालेले दाखवले, व आलेला निधी हा वाटून खाल्ला,परंतु वास्तविक कुठलेही काम केलेले नाही आहे, आज रोजी जरी नालीची अवस्था बघितली असता अत्यंत भीषण आहे, नदी लगतच्या घरात पाणी विंचू शिरत आहे, पोहंडूळ ग्रामपंचायत चा मनमानी कारभारास पोहंडूळ येथील जनता त्रस्त झाली. असून याकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकारी किंव्हा प्रतिष्ठित लोकांचे दुर्लक्ष होत आहे. असे निर्दशनास दिसून येत आहे.
गावामध्ये कुठल्याही प्रकारची सोय सुविधा उपलब्ध नाही . आणि ग्राम सभा मासिक सभा हि जनतेला माहिती न होता माझी. आजी सरपंच यांनी परस्पर नालीचे बांधकाम न करता ४ लाख रुपये उचलून खाल्ले आहेत ७ लाखाचे काम अपूर्ण यामध्ये इंजिनीअर माझी आजी सरपंच यांचा समावेश आहे अशी माहिती वार्ड क्रमांक ३ मधील लोकांनी दिली व लवकरात लवकर यांच्या वरती कार्यवाही करण्यात यावी हि कामे रोजगार हमीतील असून काम अद्यापही पूर्ण नाही केले ७ लाखाचे काम असून इंजिनीअर आणि माझी आजी सरपंच यांची या रकमेतील ४ लाख रुपये परस्पर गायब केले।ग्रामपंचायत मध्ये नागरिकांनी तक्रार केली असता नालीचे बांधकाम पूर्ण झालेले आढळले म्हणून संपूर्ण गावांमध्ये नाली गेली चोरीला अशी वार्ता पसरलेली आहे
Social Plugin