Ticker

6/recent/ticker-posts

पुरात आलेल्या प्रेताला नदीकिनारी केले दफन



पोंभूरणा प्रतिनिधी अमिन मेश्राम

पोंभूरना, वेळवा नदीच्या पूल किनारी अनोळखी प्रेत वाहून आल्याने पोंभुरना पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी लगेच धावून आले. पुरात वाहून आलेल्या प्रीत स्त्रीचे असल्याचे निदर्शनास आले असता घटनास्थळी दुपारची दोन वाजताच्या सुमारास घटनास्थळी बॉडीचे पोस्टमार्टम करता पोंभुरना ग्रामीण रुग्णालय चे डॉक्टर बोलवण्यात आले आणि घटनास्थळी गाडीचे पोस्टमार्टम करण्यात आले व लगेच त्या अनोळखी प्रेताला नदीकिनारी दफन करण्यात आले.

पोंभुरना तालुक्यातील वेळवा नदीच्या पुला किनारी प्रेत वाहून आल्याने त्या प्रेताला नदीच्या किनारी दफन केले. घटनास्थळी संपूर्ण पोलीस स्टेशनचे ठाणेदार व हवालदार चौधरी, निमसरकार व इतर कर्मचारी  उपस्थित होते. प्रेताची ओळख  पटत नसल्याने पुढील तपास पोंभुरना स्टेशन करीत आहे.