अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड शहरात चोरलेली मोटार सायकल विक्री करण्याच्या उददेशाने शहरातील मत्स्योदरी मंदीर परीसरात मिळुन आल्याने त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली. तेव्हा या आरोपीने त्याने अंबड, पाचोड, छत्रपती संभाजीनगर, पैठण, सातारा, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, कळंब जि. धाराशिव ताडकळस जिल्हा परभणी याठिकाणावरुन त्याचे एका साथीदारासह मोटार सायकली चोरुन आणल्याची कबुली दिल्याने त्यास अंबड पोलिसांनी अटक करुन त्यांचेकडुन 13 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती अंबड पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
गेल्या काही दिवसापासुन पोलीस ठाणे अंबड हददीतुन मोटार सायकल चोरी जाण्याच्या घटना घडल्याने पोलीस निरीक्षक आर. के. नाचण यांनी पोलीस ठाणेच्या डी. बी. पथकाला मार्गदर्शन करुन चोराचा शोध घेवुन मोटार सायकल हस्तगत करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यावरुन दिनांक २७ रोजी पोलीस निरीक्षक आर. के. नाचण यांना गुप्त माहीती मिळाली की, इसम नामे संभाजी नाना ननवरे रा. रुई हा अंबड शहरात मोटार सायकल चोरीचे उददेशाने येत आहे. त्यावरुन त्यांनी पोस्टेच्या ङि बी. पथकाला सदर इसमास ताब्यात घेण्याबाबत सुचना देवुन रवाना केले होते.त्यानुसार पोलीस ठाणे अंबडचे ङि बी. पथक हे त्याचा शोध घेत असतांना इसम नामे संभाजी नाना ननवरे रा. रुई ता. अंबड जि.जालना या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपानी, उपविपो अंबड विशाल खांबे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आर. के. नाचण, सपोनि अमोल गुरले, पोउपनि स्कॉट, पोहेकॉ/1118 विष्णु चव्हाण, पोहेकॉ/1272 दिपक पाटील, पोहेकॉ/927 आविनाश नरवडे, पोकॉ/47 स्वप्निल भिसे, पोकॉ/429 विठठल वैराळ, पोकॉ/508 वंदन पवार, यांचेसह स्थागुशाचे पोहेकॉ/949 सागर बावीस्कर यांनी केली आहे.





Social Plugin