तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे
अंजनेरी | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ही मोठी ग्रामपंचायत असून हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी गड आणि सहा पाडे या ग्रामपंचायतीला जोडले आहेत. अंजनेरी ग्रामपंचायतच्या या पुर्वीच्या उपसरपंचांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने दिनांक १६ वार मंगळवार रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी दोन गटांमधुन उमेदवार उत्सुक होते.
अंजनेरी ग्रामपंचायत मध्ये एकुण १४ सदस्य असून मंगळवारी झालेल्या निवडणुकीत सागर चव्हाण यांना सात मते पडले तर त्यांच्या विरोधकाला सहा मते पडली आणि एक सदस्य गैरहजर होता. हाताची बोटे वर करून झालेल्या मतदानात सरपंच श्रीमती जिजाऊ मधुकर लांडे, सदस्य जिजाबाई बदादे, गंगुबाई शिद, भास्कर लहांगे, दुर्गा लांडे, कमलेश शिंदे, सागर चव्हाण असे सात सदस्यांचा उपसरपंच पदाला पाठिंबा मिळाल्याने मा. सागर सुरेश चव्हाण हे उपसरपंच पदी विजयी झाले.
ग्रामविकास अधिकारी तथा निवडणूक अधिकारी किशोर मराठे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी बोलताना अंजनेरी ग्रामपंचायतीच्या समस्यांसाठी तसेच परिसरातील धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ असल्याने विविध विकास कामांसाठी शासनाचे लक्षवेधेल आहे. असे नवोदित उपसरपंच सागर चव्हाण यांनी सांगितले. तसेच सागर चव्हाण हे त्रंबकेश्वर तालुका युवक काँग्रेस (आय) इगतपुरी विधानसभा अध्यक्ष देखील आहेत.
निवडणुकीनंतर मा. आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते मा. संपतराव सकाळे यांनी उपसरपंच सागर चव्हाण यांचे अभिनंदन केले. यावेळी युवक काँग्रेसचे गणेश चव्हाण, अरुण शिंदे, भाऊसाहेब लांडे, राजू शिद, देविदास कामडी, माणिक चव्हाण, सुखदेव लहांगे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





Social Plugin