लोणार :प्रतिनिधी अनिल वायाळ
मेहकर ९ शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे व त्यांचे सहकारी यांच्याकडून आमरण उपोषण सुरू केले आहे शेतकरी राजा आज विवंचनेत आहे बी बियाणे खतांसाठी त्याच्याकडे दमडीही नाही कर्जबाजारी होऊन कशीबशी पेरणी केली आहे त्याच्या न्याय हक्काच्या मागन्या मान्य करून घेण्यासाठी व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत डॉ. गोपाल बछिरे व त्यांचे सहकारीआमरण उपोषणासाठी बसले आहे
शेतकरी राजाच्या मागण्या
१) तेलंगाना प्रमाणे तीन लाख पर्यंतचे पीककर्ज त्वरित माफ करण्यात यावे.
२) पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यास त्वरित देण्यात यावी.
३) दुष्काळ, अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावे.
४) ठाकरे सरकार प्रमाने सोयाबीनला ८००० व कापसाला ११००० रु. दर देण्यात यावा.
५) शेतकऱ्यास शेतीसाठी अखंडपणे १२ तास वीजपुरवठा करण्यात यावा.
६) मेहकर विधानसभा मतदार क्षेत्रातील जल जीवन मिशन च्या कामाची न्यायालयीन चौकशी होऊन त्यात भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर कडक कार्यवाही करावी.
उपरोक्त शेतकरीराजा यांच्या संबंधित मागण्या तातडीने मान्य कराव्या करिता महाराष्ट्र शासन व प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या वतीने आजपासून तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे
या उपोषणास शिवसेनेचे प्रा.डॉ. गोपालसिंह बछिरे, प्रा. गणेश बोचरे, लिंबाजी पांडव, किशोरभाऊ गारोळे, संदीपभाऊ गारोळे, गजानन जाधव सर, श्रीकांत नागरे, परमेश्र्वर दहातोंडे, लुकमान कुरेशी, हेमराज शर्मा, साहेबराव हिवाळे, नारायण बळी, श्यामभाऊ निकम, किसन पाटील, महावीर मोरे, जीवन घायाळ, श्रीकांत मादनकर, तानाजी मापारी, शेख चांद शेख अजीम, शिवप्रसाद जोगदंड, लालूभाई मुल्लाजी, इकबाल कुरेशी, अमोल सुटे, गोपाल खोतकर, गणेश पाठे, अंकुश पसरटे, जिजाताई राठोड, संजीवनी वाघ, पार्वतीबाई सुटे, शालिनीताई मोरे, तानाजी अंभोरे, अजय बछिरे, योगेश कंकाळ, साहेबराव पाटील, फिरोज खान, बाबुभाई पठाण, सुनील कमडे, किसनराव आघाव, अजय बछिरे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक बसले आहेत
Social Plugin